राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली असून भोंगे उतरविण्याच्या संदर्भात अल्टीमेटम दिला आहे. वातावरण तापलेलं असतानाच आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिराळा जि. सांगली येथील दंडाधिकारी न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
वॉरंट 2012 मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना अजामीनपात्र वॉरंटमध्ये राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. मात्र, या संदर्भात कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल देखील कोर्टाने पोलिसांना विचारला आहे.
राज ठाकरे यांच्या विरोधात 2008 मधील एका प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आयपीसी 143,109, 117, 7 मधील फौजदारी दुरुस्ती आणि मुंबई पोलिस कायद्यातील 135 नुसार हे वॉरंट तयार करण्यात आले होते. खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढलं आहे. मशिदीवरील भुंग्यांच्या अल्टिमेट दिले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम