द पॉईंट नाऊ ब्युरो ; राज्यभरात एस. टी. बस पुन्हा सूरी झाल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहणानंतर सुमारे एकोणीस हजार संप करणारे एस. टी. कर्मचारी कामावर परतले आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या महिना भरापासून अधिक कालावधीपासून एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. ज्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
एस. टी. कर्मचाऱ्यांचे वेळेवर न होणारे वेतन, मिळत असलेल्या वेतनात देखील होणारी कपात अशा कारणांमुळे एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. ज्यामुळे राज्यभरातील 250 एस. टी. महामंडळाचे आगार बंद झाले. ज्याचा मोठा परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर झाला.
राज्यभरात एस. टी. महामंडळाच्या बस बंद झाल्यानंतर, खाजगी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्यांनी तिप्पट, चौपट भाडे आकारले. ज्यामुळे प्रवासी हैराण झाले होते.
दरम्यान, आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केल्यानंतर सुमारे एकोणीस हजार संप करणारे एस. टी. कर्मचारी कामावर परतले. ज्यामुळे 250 पैकी 105 एस. टी. महामंडळाचे आगार पुन्हा सुरू झाले आहेत.
दरम्यान, एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरू केल्यानंतर सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत होता. ज्या अंतर्गत अखेर राज्य शासनाने एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांना वेतनात वाढ दिली. मात्र तरी देखील एस. टी. महामंडळ कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. म्हणून संप सुरूच होता.
राज्य शासनाने कठोर पाऊले उचलत जवळपास नऊ हजार एस. टी. कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित केले. मात्र तरी देखील संप मिटण्यास तयार नव्हता.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी संप करणाऱ्या एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा देखील इशारा दिला होता.
मंत्री अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आता एस. टी. महामंडळाचे संप करणारे एकोणीस हजार कर्मचारी कामावर परतल्यानंतर एस. टी. बस सुरू झाल्या. ज्यात रविवारी 700 हुन अधिक एस. टी. बस मधून एक लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती एस. टी. महामंडळाने दिली आहे.
अद्याप 145 एस. टी. महामंडळाचे आगार सुरू होणे बाकी आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मेस्मा लावण्याचा इशारा संप करणाऱ्या एस. टी. महामंडळ कर्मचाऱ्यांना दिला आहे.
प्रवाशांचे होणारे हाल, खाजगी वाहतूक करणाऱ्यांद्वारे
केली जाणारी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. त्यामुळे आता उर्वरित संप करणारे एस. टी. महामंडळ कर्मचारी कामावर कधी परतणार याची प्रवासी देखील वाट बघत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]