मुंबई प्रतिनिधी: राज्यात सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष शिगेला गेला आहे. या संदर्भात बोलतांना राऊत यांनी राज्यपालांना फटकारले आहे. लोकनियुक्त सरकारची राजकीय कारणासाठी अडवणूक करू नये तसेच राजकीय दबावाचा प्रकार आहे हा.राज्याचे राजभवन सरकारला मदत करण्यासाठी असते,पाय ओढण्यासाठी नाही. असे देखील राऊत यांनी सांगितले.
जी काम मंत्रिमंडळाची आहेत,त्या कामात घुसण्याचा प्रयत्न होतोय. राज्यात राज्यपाल रोज दौरे काढताना दिसत आहेत ,बंगाल आणि महाराष्ट्र चे राज्यपाल हे असे वागतात त्यांना कोण वागायला लावते, राज्यपालांचे अधिकार मर्यादित, आहेत त्यांनी घटनेनुसार वागावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करायचे असते. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल राजकीय पुढाऱ्यांसारखे दौरे काढताय हे वागणं बर नव्हे. असा सल्ला राऊत यांनी दिला.
शरद पवारांनी गृहमंत्र्यांना भेटणे गरजेचं होते, त्यानुसार भेटले त्यांच्या गृहविभागाच्या अखत्यारीत एनडीआरएफ चा मुद्दा येतो. निकष बदलून आर्थिक मदत वाढवली जाईल अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र मध्ये हातात हात घालून काम करताहेत , तो हात खांद्यावर आला एवढाच फक्त फरक, फक्त पक्ष जवळ येऊन उपयोगी नाही, मन जवळ यावी लागतात. त्यामुळे ही भेट गरजेची होती. भेटी मध्ये उद्धव ठाकरे यांचे निरोप दिले आहेत.अशी माहिती राऊत यांनी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम