राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्कात पार पडला ध्वजारोहणाचा कार्यक्रम

0
15

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त मुंबईतल्या दादर येथे शिवाजी पार्कयेथे 62 व्या वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला आहे. राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि मुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्तेे शिवाजी पार्कयेथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आहे.

महाराष्ट्र दिनादिवशी 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मध्ये  मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल देखील उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. शासकीय कार्यक्रमात ठरलेली वेळेत सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम पार पडलेला आहे. ध्वजारोहण पूर्ण होऊन पथसंस्था विशेष कार्यक्रम सादर केले जाणार आहे.

राज्यपाल जीप मधून फेरीकरता निघाले असता कार्यक्रमात सहभागी असलेले अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अग्निशामक दल, संरक्षण दल, पोलीस दल कर्मचाऱ्यांनी राज्यपालाना सॅल्युट केला आहे. दुसऱ्या ठिकाणी आयुक्त ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर मुंबईत कार्यक्रम पार पडलेला आहे. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यातून पालक मंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण करून कार्यक्रम पार पडलेला आहे.

 

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here