द पॉईंट प्रतिनिधी : देशात नरेंद्र मोदी यांच्या रूपाने जे सरकार आहे ते मुळात दमानशाही सरकार आहे.
काँग्रेस ने लोकशाहिच्या रूपाने हा देश उभा केला.
मात्र ‘दमनशाही’ च्या रूपाने भाजपने जी दडपशाही सुरू केली आहे, त्याचा आम्ही निषेध करावा तितका कमीच आहे. असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
विरोधकांची मुस्कटदाबी केली जातेय, ट्विटर वर जनतेचे प्रश्न मांडू द्यायचे नाही, बोलू द्यायचे नाही, म्हणून भाजपनं आमचे अकाउंट बंद केले आहेत, लोकसभेचं अधिवेशनात गोंधळात गेलं, नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन बोलायला हवं होतं, मात्र त्यांना संसद मान्य नाही, लोकशाही मान्य नाही असा अर्थ होतो. असे गंभीर आरोप पटोले यांनी भाजपावर केले.
विरोधकांना संपवण्याचा कट असून श्रीनगर मध्ये राहुल गांधी असताना काही अंतरावर बाँब स्फोट झाला, आज त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट आहे, केंद्र सरकारच्या देखरेखीखाली कारभार सुरू आहे, दुसरं म्हणजे नोटबंदी च्या वेळी आतंकवाद, नक्षलवाद संपवू असं मोदी म्हणाले होते, तरी आतंकवाद संपलेला नाही. बॉम्ब स्फोट होते आहे, लोकं मारताहेत याचा अर्थ भाजपा सरकार अपयशी आहे. न राहुल गांधी श्रीनगर मध्ये असताना स्फोट होत असेल तर हा कट तर नव्हता ना,याची चौकशी झाली पाहिजे, सत्यता पुढं आली पाहिजे. देशात अराजकता माजली आहे. मात्र लवकरच या सरकारला जनता घरी बसवेल.विरोधक एकजूट झाले आहेत, देशातून आता हे दमनशाही सरकार हद्दपार करू जास्त जास्त काळ हे सरकार चालणार नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम