मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यात घेतलेल्या सभां याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें आज सहभाग घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला वाव मिळाला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच जाहीर सभा असल्यामुळे या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावरच शिवसेना खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड प्रत्युत्तर देणार, विरोधी पक्षांकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकांवर तोंडसुख घेतलं आहे. “कोविड, लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचं आजारपण यामुळे उद्धव ठाकरे सभांसाठी व्यासपीठावर मध्यंतरी आले नव्हते. आतापर्यत असं व्यासपीठ मुंबईत उभारण्यात आलं नाहीये. आजची सभा ही शंभर सभांचा बाप आहे असं वक्तवय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय
आजची सभा विरोधकांच्या मनातल्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देणारी असेल. राज्यात गेल्या काही दिवसांत विरोधकांनी महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचा, लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा, महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायावर हल्ले चालवले आहेत. या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे परखडपणे भूमिका घेतली अशी आमची अपेक्षा आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम