‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो!’; पटोले यांची व्हिडीओ

0
46

द पॉईंट नाऊ ब्युरो : ‘मी मोदींना मारुही शकतो, शिव्याही देऊ शकतो!’ हे वक्तव्य आहे, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या प्रकारचा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. ज्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. ‘मी 30 वर्षांपासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उद्धार करून टाकतात, शाळा – कॉलेज घेतात. मात्र मी असे काही केले नाही. मी जो आला त्याला मदत करतो, म्हणून मी मोदीला मारुही शकतो, शिव्याही देऊ शकतो’ अशा प्रकारचं वक्तव्य नाना पटोले यांनी या व्हिडीओ मध्ये केलेलं आहे.

नाना पटोले यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी नेत्यांनी आगपाखड करून पटोलेंना चांगलंच धारेवर धरलेलं आहे.

पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा बालिशपणा मांडला आहे. आता नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, त्यांच्या बाबत खालच्या पातळीचे वक्तव्य करणे लाजिरवाणे आहे. असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले. तर पटोले यांची भाषा निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

तर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ‘आपण गावातील मोदी नावाच्या गुंडाबद्दल बोललो, पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही.’ अशी सारवासारव केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here