द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : राज्यात सध्या ED व CBI ची दहशत आहे. मात्र आता या केंद्रीय यंत्रणांचा वापर आता धमकी साठी केला जात असल्याचे समोर आले आहे. शरद पवारांच्या नावाने निनावी फोनचं प्रकरण मिटत नाही. तोच आता मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना व्हाँट्स अँपवर धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नार्वेकर या़ंनी हीबाब मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या कानावर ही बाब टाकल्यानंतर आयुक्तांनी हे प्रकरण तपासासाठी मुंबईच्या गुन्हे शाखकडे सोपवलं आहे. मिलिंद नार्वेकर यांना धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली, हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून मुंबई पोलीस चौकशी करत आहेत.
शिवसेनेत मिलिंद नार्वेकर यांचे स्थान वेगळे असून, अनेकवेळा ते वादाचे कारण देखील ठरले आहेत. नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आहे. ठाकरे कुटुंबियांच्या ते एकदम जवळची व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात. विशेषता उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर हे त्यांच्या सावली सारखे मागे असतात. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे. लवकरच या प्रकरणाचा छेडा लावण्याचे आवाहन पोलिसांन समोर आहे.
धमकी देऊन फोन करणाऱ्या व्यक्तीने नार्वेकरांना मेसेज करून काही मागण्या केल्या आहेत. ही मागणी पूर्ण न केल्यास त्या व्यक्तीने नार्वेकर यांना सीबीआय ईडी किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणाद्वारे अडचणीत आणण्याची धमकी दिली. हा मेसेज पाहताच नार्वेकर यांनी हेमंत नगराळे यांच्या ही बाब निदर्शनास आणून देत लेखी तक्रारही दिली असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. इडी सीबीआय या यंत्रणा देशात चांगल्या कामांसाठी आहेत मात्र आता या, यंत्रणांच्या नावाने धमकी दिली जात असल्याने हे प्रकार गंभीर असल्याचे द्योतक आहे.
माहिती मिळताच या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संबधित नंबरची माहिती कंपनीकडे मागितली आहे. आरोपीने ज्या नंबरहून ही धमकी दिली आहे. त्यावेळी त्यांनी एका अॅप्लिकेशनचा वापर केला असावा. ज्यानेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांसमोर मोठे आवाहन असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम