द पॉईंट नाऊ ब्युरो : ईडी आणि इतर तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या एक प्रकारे मागेच लागल्याने, नेतेमंडळींची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे असेच म्हणावे लागेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ब्लॅक मनी प्रकरणी कारवाई करण्यात आल्यानंतर, महाविकास आघाडी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, माझ्या मुलीला जर ईडीचं बोलावणं आलं तर मी आत्महत्या करेन, असं म्हटलं आहे. असं म्हणून आव्हाड यांनी एक प्रकारे तपास यंत्रणांना धमकीच दिली आहे.
मागील काही दिवसांत महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांचे नातलग तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. त्यात अनिल देशमुख, नवाब मलिक हे दोन्हीही नेतेमंडळी कारावासात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
आता आव्हाडांना नेमकी अशी कोणत्या गोष्टीमुळे कारवाईची भीती वाटते आहे की, त्यांनी थेट आत्महत्या करण्याचेच वक्तव्य केले. हे आव्हाड यांनाच ठाऊक.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम