द पॉईंट नाऊ ब्युरो ; कोरोनाच्या (Cowid) नवीन प्रकाराने सर्वांची झोप उडवली आहे. आणि आता मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thakarey) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) आत्ता कुठे परिस्थिती सुधारली, असे वाटत असतांना पुन्हा एकदा कोरोनामुळे (Cowid) चिंतेचे ढग दाटून आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या ‘मायक्रोन’ (Micron) या नव्या प्रकाराच्या शिरकावाने संपूर्ण जगाला (World) धास्ती पडली आहे.
भारतात (India) देखील याबाबत काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) आत्ताच दक्षिण आफ्रिकेतुन (South Africa) आलेला एक प्रवासी कोरोना (Cowid) पॉझिटिव्ह (Possitive) आढळल्याने, धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) सरकारची (Government) नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakarey) यांच्यासह बैठक (Meeting) पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात जर लॉकडाऊन (Lockdown) लागावा अशी इच्छा नसेल, तर सर्वांनी बंधने (Restrictions) पाळणे, काळजी घेणे बंधनकारक आहे.
जगभरात (World) सध्या वेगवेगळ्या देशांमध्ये (Different Countries) लॉकडाऊन (Lockdown) पुन्हा एकदा लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतात (India) देखील प्रशासन सतर्क झाले आहे.
तर महाराष्ट्रात (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्थानिक प्रशासकीय व्यक्तींना योग्य ती पाऊले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्र सरकार (Central Government) काय सांगेल, याची वाट न बघता आता आपल्यालाच योग्य ती आवश्यक पाऊले उचलणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
तर आता पुन्हा राज्यभरात शाळांना (Schools) देखील कोविड ला रोखण्याच्या उद्देशाने, आधी प्रमाणेच सर्व ते बंधन पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी सर्व मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
आत्ता कुठे शाळा (Schools), महाविद्यालये (Colleges) महाराष्ट्रात सुरू झाली आहेत. त्यामुळे आत्ता पर्यंत न दिसणारी गर्दी आता पुन्हा वाढू लागली आहे.
परिस्थिती बिघडल्यास शाळांबाबत देखील योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो.
आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे सांगितले आहे. पण काळजी घेण्याबाबत देखील त्यांनी सूचना केली आहे.
महाराष्ट्रात राज्य शासन आता सतर्क झाले आहे. ज्यासाठी बैठक घेऊन सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे आता पुढे काय आणि कशी परिस्थिती राहते? हे सगळेच नागरिकांच्या काळजी घेण्यावर अवलंबून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
[…] […]