मुंबई प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्दायावरून काढलेल्या भोंग्याच्या प्रकरणाने आज संपूर्ण महाराष्ट्र दणाणून निघाला आहे. आणि काल पार पडलेल्या राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेनंतर राज्याच्या राजकारणात टिकांचे महासत्र सुरु झाल्याचे दिसून आले . ह्याच सत्रात आता ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे ह्यांनी उडी घेत ” रस्त्यावर नमाज पठन चुकीच मग गणपती मिरवणूक , दहिहंडी , दांडीया यांच काय करणार ? असा सवाल उपस्थित केला आहे .
” भोंगे उतरणे वंदनीय बाळासाहेबांच्या काळातही शक्य झालं नव्हतं . भोंगे उतरवल्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचेच होईल . प्रत्येक गावाची जत्रा/ यात्रा , उरूस , गणपती मिरवणूक , १० दिवसांचा नवरात्रोत्सव , शिवजयंती , संभाजी महाराज्यांची जयंती , प्रत्येक जातीतील युगपुरूषांचे दिवस त्यांच्या यात्रा , पाडवा यात्रा , दिवाळी पहाट , दहीहंडी सर्वच संकटात येतील ” असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली . जर ‘ रस्त्यावर नमाज पठन चुकीच तर मग गणेशोत्सवासाठी रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या मंडपांच काय , मंडपात होणाऱ्या आरत्यांच काय , दांडीया , मिरवणुकांच काय , त्यापण रस्त्यावरच होतात ना ? स्पिकर खाली आलेच पाहिजेत तर मग हिंदू उत्सवात लावल्या जाणाऱ्या स्पीकर्सच काय ? ” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले . व त्याचबरोब या प्रकरणी आपली भूमिका ३ तारखेला नगरमध्ये होणाऱ्या मेळाव्या मांडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .
सोबतच राज ठाकरेंच्या ३ मे पर्यंतच्या अल्टीमेटम वर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत ‘ राज्यात भोंगे महत्वाचे नाहीत , सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोंगे हटवल्यास तुमच्या देवाचे कार्यक्रम कसे करणार? ‘ असा सवाल उपस्थित करत आपली प्रतिक्रिया दिली आहे . तर , राज्यात भोंग्यवरून राजकारण करून हिंदू – मुस्लिम यांच्यात धार्मिक तेढ निर्मण करण्याचा प्रयत्न चालू आहे .असे म्हणत राज ठारेंवर निशाणा साधला . ” दुसऱ्याची खपली काढायला गेल की आपल्या अंगावर येणारच . असे म्हणत हनुमान चालीसा हिंदीत आहे वाचायचेच असेल तर हनुमान सोत्र वाचा . ” असा टोला देखील त्यांनी लगावला .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम