औरंगाबाद प्रतिनिधी : निवडणूक लढवण्यासाठी लोक काय करतील भरोसाच नाय, औरंगाबादच्या (aurangabad) रमेश पाटील या पठ्याने चक्क बॅनरच्या लावून निवडणूक (election) लढवण्यासाठी बायको (wife) पाहिजे असा मजकूर लिहला. हे म्हणजे जरा अति झाले अन हा भाऊ महाराष्ट्रभर ट्रोल झाला.
राजकारणापाई आखी अब्रू चव्हाट्यावर टांगली भावाने, इच्छुक उमेदवार रमेश पाटील म्हणाले की, मला १ मुलगा आणि दोन मुली आहेत. लॉकडाऊनमध्ये मला एक मुलगी झाल्यानं आता मी निवडणूक लढण्यास पात्र नाही. त्यासाठी मी दुसरं लग्न करुन बायकोला निवडून आणण्याची शक्कल लढवली आहे. मला सकाळपासून एक फोन आला त्यांनी सांगितले आमच्याकडे १५-१६ एकर जमीन आहे. निवडणुकीचा खर्चही द्यायला तयार असल्याचं म्हटलं परंतु मी अद्याप प्रतिसाद दिला नाही असं त्यांनी सांगितले. तसेच मी याआधी बाळासाहेबांचा शिवसैनिक होतो आणि नंतर राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक झालो अशीही माहिती रमेश पाटील यांनी दिली.
दरम्यान, या बॅनरवरून सकाळपासून राज्यभर व्हायरल आले आहे. दुपारी संतप्त भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी (Bjp) गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या बाजार पेठेतील बॅनरवर शाईफेक करीत बॅनर फाडला. भाजपच्या महिलांनी हे बॅनर शाईफेक करत फाडले, तसेच पाटील यांच्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपा तर्फे करण्यात आली आहे. अशा प्रकारे बॅनर लावण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. यामुळे महिलांचा अपमान होत आहे, असा आरोप भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने अनेकांना इच्छा असूनही निवडणूक लढवता येत नाही, त्यामुळेच हा प्रकार समोर आला आहे. नेटकर्यांनी मात्र अफाट आनंद लुटला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम