मनसेचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, मुलांना जातीपातीचं राजकारण शिकवू नका

0
45

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे. मशीदीवरील भोंग्यासंदर्भात त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेत आहे. भोंगे हटविण्याच्या विधानावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असे म्हटले होते. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी रस्त्यावर उतरण्याचं खुलं आव्हानचं दिलं होतं.

आता मनसेने त्यांच्यावर पलटवार केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी सुजातवर काय प्रकारचे संस्कार केले आहेत? असा सवालही मनसेनं विचारला आहे.
मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी सुजात यांच्यावर पलटवार केला आहे. मुलगा चांगला बोलतोय, राजकारणात पुढे येईल. पण, जातीपातीचं राजकारण सुजातला शिकवू नका, अशा प्रकारचे संस्कार मुलाला देऊ नका, असा सल्ला मनसेचे अमेय खोपकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला आहे. तसेच, प्रकाश आंबेडकरांकडून सुजातवर काय प्रकारचे संस्कार झालेत? असा प्रश्नही खोपकर यांनी विचारला आहे.

अविनाश जाधव यांनीही सुजातचा हा प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न असल्याचे म्हटलंय आहे . कारण, त्यांना माहितीय राज ठाकरे किंवा त्यांचे सुपुत्र अमित यांच्यावर बोलल्यास आपणांस प्रसिद्ध मिळते. त्यामुळे ते असं विधान करत असतात. बहुजनांची मुले असतात, मराठ्यांची असतात, सगळ्यांचीच मुले असतात मी ही असतो, माझ्यावरही 67 ते 68 गुन्हे दाखल आहेत. ते काय बोलतात ते त्यांनाच माहिती नाही, असे म्हणत सुजात यांच्या विधानावर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here