द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : छगन भुजबळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची मागणी असून त्यांच्या राजीनाम्याची वाट बघण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी भुजबळांची हकालपट्टी करावी तसेच लिस्ट मधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे असे किरीट सोमैय्या यांनी सूचक वक्तव्य केले आहे. पत्रकारांनी विचारले नोटीस जितेंद्र आव्हाडांना का ? यावर सोमैय्यानी हसून उत्तर देणे टाळले.
सोमय्या आज नाशिक दौऱ्यावर होते. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नामी आणि बेनामी संपत्ती जाहिर करावी 120 कोटी रुपयांची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे आज मी भुजबळ यांची आर्म स्ट्रॉंग एनर्जी कंपनीची पाहणी केली
या कंपन्यांमध्ये जो पैशा आला आहे तो कुठून आला याची चौकशी झाली पाहिजे आर्म स्ट्रॉंग कंपनीत भुजबळ यांनी आपला पैशा पांढरे केले आहेत असा थेट आरोप भुजबळांवर झाल्याने आर्मस्ट्राँग कंपनी सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मुंबईत देखील मी भुजबळ यांच्या भुजबळ महाल ची पाहणी करायला जाणार आहे तसेच मुंबईत बांधलेल्या करोडो रुपयांच्या घरासाठी लागणारा पैसा कुठून आला भुजबळ मुंबईत ज्या 9 मजली घरात राहतात ते कुणाचा आहे याचा खुलासा होणं गरजेचं आहे.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माझा आहवान आहे की भुजबळ मुंबईत ज्या घरात राहतात ते घर कुणाचा आहे हे शोधून दाखवा पनवेल, नाशिक, अंधेरी, सांताक्रूझ याठिकाणी असलेली मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे अशी माहिती भुजबळांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम