भास्कर जाधवांच्या माजोरड्या भाषेला लगाम घाला ; संतप्त नेटकऱ्यांची मुख्यमंत्रांकडे मागणी

0
53

चिपळूण : कोकणात निसर्गाने होत्याचे नव्हते केले. जनता होरपळून निघाली असतांना, नेतीयांचे दौरे सूर झालेत. यात मुख्यमंत्री नम्रपणे आज आपत्तीग्रस्त लोकांशी संवाद साधत असतांना त्यांचे माजोरडे सहकारी आमदार मात्र सभ्यतेला तिलांजली देताय. भास्कर जाधव नामक आमदार प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गांभीर्य विसरून बसलाय की काय असा प्रश्न उपस्थित राहतोय. मुख्यमंत्र्यांनी या उर्मट आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

खासदार-आमदारांचे २ महिन्याचे पगार कोकण साठी वळवा पण आम्हला वाचवा…

चिपळूणमध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या बाजारपेठेतल्या, एका गल्लीत हा ताफा आला असताना, एका दुकानदार महिलेने, “तुम्हीच आमची मदत करू शकता, हवं तर खासदार-आमदारांचे २ महिन्याचे पगार कोकणसाठी वळते करा, पण आम्हाला वाचावा!” असा टाहो फोडला. आमदार जाधवांनी विचित्रपणे हसत त्या महिलेला, “५-६ महिन्याचा दिला तरी आता काही होणार नाही. तुझा मुलगा कुठंय? ए आईला सांभाळ रे!” असं म्हणत महिलेची चेष्टा केली. मुख्यमंत्र्यांसमोरच आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या एका महिलेवर त्यांनी, थेट हात उगारल्याचा व्हिडीओही सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, यात त्यांनी थेट हात उगारल्याचं स्पष्टपणे दिसुन येत आहे. आता या प्रकरणामुळे भास्कर जाधव चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यावरून नेटकऱ्यांनी, राज्य सरकार अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अतिवृष्टीने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेल्या चिपळूणचा ४ दिवसांनंतर आज मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी पुरामुळे उध्वस्त झालेल्या लोकांच्या भावना समजून घेत प्रश्न ऐकून घेतले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यसोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, परिवहन मंत्री अनिल परब होते.

मुख्यमंत्री इतके नम्रपणे वावरत असतांना त्यांचे मुजोर सहकारी मात्र डरकाळ्या फोडत आहेत . यावर पक्ष प्रमुख काय निर्णय घेणार याकडे सर्व्यांचे लक्ष आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे नाव पावसाळी विधिमंडळ अधिवेशनापासुन चांगलंचं चर्चेत आलं आहे. तालिका अध्यक्ष असताना त्यांनी भाजपच्या १२ आमदारांना, गैरवर्तन अरेरावी, अश्लील भाषा वापरली यासाठी कारवाई करून त्यांचं १ वर्षासाठी निलंबन केलं होतं. अशा समंजस आणि न्याय प्रामाणिक असलेल्या नेत्यावर, मुख्यमंत्र्यांसमोर जाहीररीत्या केलेल्या या कृतींसाठी काही कारवाई केली जाणार का? हे अशोभनीय कृत्य करून, त्यांना काय दाखवुन द्यायचं आहे? त्यांना एवढा कसला माज आहे? असे प्रश्न उठत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here