भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

0
42

द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेना नेते तथा महाविकास आघाडीमधील प्रमुख मंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागले आणि सगळीकडेच चर्चा होऊ लागली. विरोधकांना तर यामुळे आयते कोलीत मिळाले. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत का? शिवसेनेत काही चलबिचल आहे का? असे अनेक प्रश्न एकामागे एक विचारले जाऊ लागले.

तर झालं असं की, एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाणे शहरातील वागळे इस्टेट भागात थेट ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर लागले. त्यामुळे सगळीकडेच चर्चा रंगली.

दरम्यान, मागील काही काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणाने बरेच दिवस उपस्थित होऊ शकले नव्हते. त्यावेळी विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावे घेत, त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात यावे असे पर्याय सुचवले. मधल्या काळात तर थेट रश्मी ठाकरे याच मुख्यमंत्री होणार म्हणून अफवा विरोधी पक्षांनी पसरवली. त्यामुळे आत्ता एकनाथ शिंदे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावल्याने चर्चेला उधाण आले होते.

याबाबत नंतर एकनाथ शिंदे यांनी संबंधित कार्यकर्त्यांना फोन केल्यावर, भावी मुख्यमंत्री हे शब्द बॅनरवरून खोडण्यात आले. तर आम्ही फक्त प्रेमाखातर म्हणून या प्रकारचे बॅनर लावले असे संबंधित कार्यकर्त्यांनी म्हटले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here