भाजप राष्ट्रवादी युती; अजित पवारांचे सडेतोड उत्तर

0
19

राजकीय वर्तुळात मनसेचे नेते राज ठाकरे चांगलेच चर्चेत आहेत. भोंगांच्या वादावरून अनेक वेळा ते अडचणीत येताना दिसले होते. तर आत्ता एक नवीन प्रश्न उपस्थित झाला भाजपा आणि राष्ट्रवादीची युती असा सवाल समोर येताच यावरच अजित पवारांनी टिकास्त्र सोडले.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार यांनी मनसेला टोला लगावला, राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवार यांना जातीयवादी म्हटले असते का? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री यांनी केला आहे. राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाहीत. ते फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात. मात्र लोकसभेच्या वेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. 2019 ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदासाठी हे सगळं होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , मनसे सोडून सर्व पक्षांनी एकच भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिली आहे. उद्या एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. उत्तर प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्री योगी यांनी काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे,

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here