द पॉईंट नाऊ ब्युरो ; केंद्रात सत्ता असलेल्या भाजप ला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
भाजप चे खासदार वरुण गांधी हे भाजप ला सोडचिट्ठी देणार असल्याची चर्चा आहे.
खासदार वरुण गांधी हे भाजप चे खंदे आणि एकनिष्ठ समर्थक समजले जातात. मात्र आता हेच वरुण गांधी भाजप ला धक्का देणार, असं बोललं जातंय.
खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या मातोश्री मनेका गांधी या भाजप मधील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत.
मात्र आता वरुण गांधी भाजप ला सोडचिट्ठी देऊन गेले, तर भाजप ला हा मोठा धक्का असणार आहे.
मागील दोन वर्षांपासून वरुण गांधी यांना पक्षात हवे तसे, योग्य पद देण्यात आलेले नाही. आणि त्यामुळे ते नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
खासदार वरूण गांधी हे भाजप सोडून, काँग्रेस मध्ये नाही तर तृणमूल काँग्रेस मध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
वरुण गांधी आणि तृणमूल काँग्रेस च्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची लवकरच भेट होणार असल्याची चर्चा आहे.
मागील बऱ्याच कालावधी पासून वरुण गांधी हे वारंवार पक्ष विरोधी वक्तव्य करत असल्याची चर्चा आहे.
वरूण गांधी यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून, शेतकऱ्यांच्या मागण्यां बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
तर केंद्राने शेतकरी वर्गासाठी आधीच योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. असे झाले असते, तर इतक्या शेतकऱ्यांचा बळी गेला नसता, असे वरूण गांधींनी म्हटले होते.
वरुण गांधी यांच्या या पवित्र्याने त्यांची पक्षा बाबत नाराजी स्पष्ट दिसून येत आहे.
त्यामुळे वरूण गांधींच्या या पवित्र्याने भाजप मध्ये अस्वस्थता वाढली आहे.
वरुण गांधी यांनी भाजप ला सोडचिट्ठी दिल्यास, भाजप ला तो मोठा धक्का असणार आहे.
वरूण गांधी हे भाजप चे एक प्रमुख नेते आहेत. त्यांच्या मुळे पक्षाचे वजन देखील मोठे आहे.
मात्र वरूण गांधी भाजप ला रामराम ठोकून गेले, तर तो भाजप ला एक मोठा धक्का असेल.
वरुण गांधी हे भाजप चे उत्तर प्रदेश च्या पिलीभीत मतदार संघातील खासदार आहेत. त्यामुळे भाजप ला एक मोठे पाठबळ आहे.
मात्र आता वरूण गांधींच्या या अशा पक्ष विरोधी पवित्र्याने भाजप च्या केंद्रीय नेतृत्वात देखील अस्वस्थता वाढली असेल, हे नक्की.
वरुण गांधी हे काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे वरूण गांधी हे काँग्रेस कडे वळतात का? अशीही शंका उपस्थित केली जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम