भाईंदर शहरप्रमुख पप्पू भिसेंना, शिवसैनिक महिलांकडून चोप

0
44

भाईंदर शिवसेना शहर प्रमुख पप्पू भिसे यांना काही महिला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पक्षांतर्गत वादामुळे पप्पू भिसे यांना शिवसेनेच्या शाखे बाहेर महिला शिवसैनिकांनी मारहाण केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचा पक्षांतर्गत रविवारी कार्यक्रम होता. पप्पू भिसे भाईंदर शिवसेना शहर प्रमुख आहेत. कार्यक्रमात शाब्दिक वाद झाल्याने महिला शहर संघटक वैदेही परूळेकर आणि अन्य महिलांनी पप्पू भिसे यांना शाखेच्या बाहेर ओढून बेदम मारहाण केली. पक्षांतर्गत नियुक्त्यांवरून हा वाद निर्माण झाला होता. भिसे यांनी शाखेत शिवीगाळ केल्यामुळे महिलांनी शाखेबाहेर नेऊन मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भाईंदर पोलीस ठाण्याच्या अगदी समोर ही शिवसेना शाखा आहे. शहरात सर्वत्र या मारहणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून, चर्चा देखील सुरू आहे. तसेच, शहरप्रमुख पप्पू भिसे यांच्यावर या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर भिसे यांच्या तक्रारीवरून परुळेकर यांच्याविरोधात मारहणीची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकाराची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी दिली आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here