प्रियांका गांधींची यूपी निवडणुकीसाठी मोठी दावेदारी

0
15

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी केली आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आघाडी हातात घेतली आहे. यूपी निवडणुकीत महिलांना ४० टक्के तिकीट देण्याची घोषणा करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आणखी एक मोठी पैज लावली असून आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा केली आहे. आशा व अंगणवाडी सेविकाना १० हजार मानधन देण्याचे घोषित करण्यात आले आहे.
महिलांसाठी काँग्रेसच्या मोठ्या घोषणा
यापूर्वी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सांगितले होते की, काँग्रेसने महिलांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या, ‘माझ्या उत्तर प्रदेशच्या बहिणींनो, तुमचा प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला असतो. ते समजून घेत काँग्रेस पक्षाने आपल्यासाठी स्वतंत्र महिला जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर वर्षाला भरलेले ३ सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. राज्य सरकारच्या बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास असेल.

प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या की, आशा आणि माझ्या अंगणवाडीच्या बहिणींना प्रति महिना १० हजार रुपये मानधन मिळेल. नवीन सरकारी पदांमध्ये आरक्षणाच्या तरतुदीनुसार ४० टक्के पदांवर महिलांची नियुक्ती केली जाईल. वृद्ध-विधवा निवृत्ती वेतन दरमहा १००० रुपये दिले जाईल. अश्या बड्या घोषणा सध्या काँग्रेस करत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here