प्रताप सरनाईकाकडून वाढदिवसानिमित्त ठाण्यातील नागरिकांना दिलासा देणारी भेट

0
39

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यकर्ते समाजासाठी कार्यक्रम उपलब्ध करतात तसेच भेटवस्तुंचे आयोजन करतात. यात्रा, उत्सव अशा अनेक प्रकारच्या महिलांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच स्वतःच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना अन्न वाटप देखील केले जाते. परंतु ठाण्यात आज अनोख्या पद्धतीने वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदार प्रतापसरनाईक यांनी जनतेला दिलासा देणारी भेटवस्तू दिली आहे. त्यामुळे ठाण्यात चर्चेला उधाण आहे.

सोमवारी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील तत्वज्ञान विद्यापीठाजवळील कैलास पेट्रोल पंपावर शिवसेना आमदार प्रतापसरनाईक वाढदिवसानिमित्त चक्क पेट्रोलचे वाटप ठेवलं आहे. विशेष म्हणजे फक्त 1 रुपयांत नागरिकांना 1 लीटर पेट्रोलचे वाटप करण्यात आले.त्यामुळे सोमवारी सकाळी १० वाजता कैलास पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. दिवसाकरता का होईना परंतु नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

२५ एप्रिल रोजी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कैलास पेट्रोल पंपावर ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आशा डोंगरे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप डोंगरे, अब्दुल सलाम यांनी हे तुमच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या उपक्रमाने या पेट्रोल वाटपाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंधन दरवाढ किमतींविरोधात शिवसेनेने निषेध नोंदवत सुमारे १००० वाहनधारकांना प्रति लिटर १ रुपये प्रति लिटर पेट्रोलचे वितरण करण्यात आले. पेट्रोल वाटपाचा या अनोख्या संकल्पनेने नागरिकांकडून प्रतापसरनाईकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here