दिल्ली प्रतिनिधी: शिवसेना संसदीय पक्षाची आज बैठक आहे. राज्यसभेचे नेते संजय राऊत आणि लोकसभेचे नेते विनायक राऊत बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. संसद परिसरातील कार्यालयात बैठक होणार आहे.
मराठा आरक्षण आणि राज्यातील पूर परिस्थिती संदर्भात शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची वेळ मागीतली आहे यावर चर्चा होणार आहे. आज किंवा उद्या पंतप्रधानांची वेळ मिळेल अशी शिवसेनेला आशा आहे मात्र. वेळ मागूनही पंतप्रधान भेटत नसल्याने सेनेच्या नेत्यांन मध्ये संताप दिसून येतोय.
राज्यात शिवसेना सत्तेत असून सेना भाजपा संघर्ष सध्या जोरात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी पंप्रधानाची भेट घेऊन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न दिसतोय. केंद्रात आरक्षणाची मर्यादा वाढवावी. व मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही प्रमुख सेना नेत्यांची आहे.
राज्यात कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात पुराणे थैमान घातले असून, केंद्राने यात मदत करावी. राजकारण बाजूला ठेवून माणुसकीची दर्शन घडावे ही मागणी सेना नेत्यांनी केली आहे. नुकतीच संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची देखील भेट घेतली आहे. पंतप्रधान सेना नेत्यांना वेळ देता का याकडे लक्ष लागून आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम