द पॉईंट प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील एकेकाळचे ‘फायरब्रॅंड’नेते एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिलेदार झालेत. त्यांच्या आरोग्याच्या कारणास्थव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूूला या जमीन घोटाळ्या प्रकरणी अटक होणार असल्याचे बोलले जातेय. मात्र खडसे हे मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्याने, ही अटक लांबणीवर पडल्याचे बोलले जातेय.
जगातील सर्वात मोठी कायदा व्यवस्था म्हणून भारतीय कायदा व्यवस्था ओळखली जाते. १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, हा भारतीय कायदा व्यवस्थेचा दंडक आहे. भारतीय कायदा व्यवस्थेवर अनेक जण नाराजी देखील व्यक्त करतात. कारण या कायदा व्यवस्थेत अनेक पळवाटा असल्याचे अनेकांकडून वारंवार म्हटले जाते.
त्याचाच आधार घेऊन एकनाथ खडसे अटक टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेत का? असा सवाल उपस्थित केला जातोय. मागील काही काळात अनेक दिग्गज नेत्यांच्या मागे वेगवेगळ्या घोटाळ्यांमध्ये ईडी चा ससेमिरा चालू झाला होता. त्याअंतर्गत अनेक दिग्गज नेत्यांना अटक देखील झाल्या. चौकश्या सुरू झाल्या.
त्यात माझ्यामागे ईडी लावली तर मी भाजपच्या अनेक घोटाळ्यांची सीडी लावेन असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. ज्यामुळे सर्वांचेच डोळे विस्फारले गेले होते. एकनाथ खडसे यांच्याकडे खरच भाजपच्या कोणत्या घोटाळ्यांची माहिती आहे का? त्यांच्याकडे काय पुरावे आहेत? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र एकनाथ खडसे यांच्या द्वारे कसली सीडी अद्याप पर्यंत बाहेर मात्र आली नाही. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील खडसे भाजपच्या घोटाळ्यांची सीडी कधी बाहेर काढताय असा सवाल उपस्थित केला होता.
दरम्यानच्या काळात वातावरण काहीसे शांत झाले असतांना, आता पुन्हा जमीन घोटाळ्या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्याने, या चर्चेला उधाण आले आहे. अटक टाळण्यासाठी म्हणून तर खडसे रुग्णालयात दाखल झाले नाहीत ना? अशी चर्चा लोकांमध्ये रंगू लागली आहे.
त्यामुळेच भारतीय कायदा व्यवस्थेतील पळवाटाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. याआधी देखील ईडी द्वारे खडसे यांची जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. भोसरी इथल्या जमीन घोटाळा प्रकरणी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची देखील या आधी चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंच्या अटकेची शक्यता वर्तवली जाऊ लागल्याने, चर्चा रंगू लागल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
राजकारण कणाऱ्यांना लोकं किती गरीब दिसता