नागपूर दौऱ्यात संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

0
11

राज्यात भाजप शिवसेना वाद टोकाला पोहोचला आहे. तर राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत विदर्भ दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या नागपुर दौऱ्यावर टिका केली, नागपुरच्या मातीत एक वेगळेपण आहे. त्यामुळे संजय राऊत वारंवार नागपुरला आले तर त्यांना थोडी सुबुध्दी येईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर संजय राऊत यांनी एका सभेत प्रत्युत्तर दिले.

शिवसंपर्क अभियानासाठी खासदार संजय राऊत रात्री नागपुरात दाखल असताना विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, दुर्देवाना तुम्हाला सुबुध्दी आली नाही. त्यामुळे तुमचे मुख्यमंत्रीपद गेलं. तसेच त्यावेळी तुम्हाला सुबुध्दी आली असती की, शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. हिंदूत्ववादी पक्ष आहे.

आपण त्यांच्याशी मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे. ही सुबुध्दी आली असती तर आपण कदाचित मुख्यमंत्री असता, तसेच तुम्हाला तेव्हा दुर्बध्दी सुचली आणि सुबुध्दीची अक्कल तुम्ही देत आहात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की, नागपुरला ममत्व आहे. कारण नागपुर आमची उपराजधानी असून नागपुरकरांचे प्रेम वाढत आहे. मात्र बरेचसे नागपुरकर हल्ली मुंबईत असतात. त्यामुळे आम्ही नागपुरला आलो आहोत, अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here