नवाब मालिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले ? भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

0
40

मुंबई प्रतिनिधी : राज्यात सेना भाजपा संघर्ष जोमात असून भाजपाच्या श्वेता महाले यांनी गंभीर आरोप केले आहेत महाले म्हणाल्या की नवाब मालिकांनी मुंबईत (Mumbai) बॉम्ब स्फोट घडवून आणले आहेत, तसेच शिवसेना भवनात बॉम्ब स्फोट घडवून आणले अशा दहशतवादी नवाब मालिकांना (Nawab malik) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत असे धक्कादायक वक्तव्य भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी केलं आहे.

पुढे म्हणाल्या की शिवसेनेने त्याच दिवशी हिंदुत्वाला लाथ मारली, जेव्हा ते सत्तेसाठी काँग्रेससोबत गेले. या सरकारच्या काळात राज्यात एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांनाच संरक्षण दिलं जातंय. बाळासाहेब ज्या हिंदुत्वादासाठी लढले, तेच उद्धव ठाकरे विसरलेत, शिवसेनेचं हिंदुत्व आता फक्त अंगावर चढवण्यापुरतं उरलंय असं श्वेता महाले म्हणाल्या शिवसेना काँग्रेस सोबत सत्तेत बसले त्याच दिवशी यांनी हिंदुत्वाला लाथ मारली आहे. सेनेचे हिंदुत्व म्हणजे ढोंगीपणाच आहे. हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले, मोठे झाले. त्याच हिंदुत्वाला आजची शिवसेना विसरली आहे .त्यामुळेच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको. खर हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत निघून गेले आहे असे देखील श्वेता महाले यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना फरार गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली असताना राष्ट्रवादीने मात्र त्यासाठी नकार दिला असून सध्या त्यांची खाती दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे.

तसंच काँग्रेससोबत जाणारी शिवसेना उद्या जर एमआयएमसोबत गेली तर आश्चर्य वाटायला नको, असंही त्या म्हणाल्या. ज्या नवाब मलिकांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवले. त्यांनाच वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे आले आहेत. हे दुर्देवी असल्याची टीका भाजप आमदारांनी केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here