राज्याचे मंत्री आणि अवैध मालमत्ता प्रकरणी सध्या ईडीच्या ताब्यात असलेले नवाब मलिक हे सध्या आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मलिकांनी न्यायालयात खाजगी रूग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी द्यावी अशी याचिका दाखल केली होती.
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयानं परवानगी दिल्याने कुर्ला येथील क्रिटीकेअर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मलिक यांना किडनी आणि इतर व्याधींचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पुढील उपचार होणार आहे.
2 मे रोजी नवाब मलिक यांना आर्थर रोड कारागृहात प्रकृती खालावल्याने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनेक व्याधींनी त्रस्त असल्याने मलिक यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार होणार असून यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
हॉस्पिटल बाहेर पोलीस बंदोबस्ताचा खर्च हा मात्र नवाब मलिक यांना करावा लागणार आहे, असे निर्देश कोर्टाने दिले आहे.नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जामीनासाठी याचिका दाखल केल्या होत्या. पण न्यायालयानं हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत जामीन अर्ज फेटाळून लावले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम