नवाब मलिकांच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्त्याने तलवार नाचवत साजरा केला आनंद

0
41

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांना ईडीने आज अटक केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एकीकडे खळबळ उडाली असतांना, भाजपच्या कार्यकर्त्याने मात्र तलवार नाचवत आनंद साजरा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांना अटक केली. त्यानंतर भाजप कार्यकर्ता मोहित कंबोज यांनी तलवार नाचवत कार्यालयाच्या बाहेर फटाकेही फोडले. कंबोज यांनी ते पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील सांगितले. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मलिक यांना अटक झाल्यानंतर, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईत सिल्वर ओकवर येण्याचे आदेश दिले. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे देखील पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मलिक यांच्या अटकेनंतर खळबळ उडाली असल्याचे बोलले जात असून, त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईत बोलावल्याने त्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते.

आता भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज हे आनंद साजरा केल्यानंतर उद्या पत्रकार परिषदेत काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here