द पॉईंट नाऊ ब्युरो : मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेले नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल आज निकालासोबत शांत झाले. आज अनेकांना धक्का देणारे निकाल लागले.
औंढा नागनाथ, जालना जिल्ह्यातल्या मंठा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने आपला भगवा फडकवला. औंढा नागनाथ येथे शिवसेनेने 17 पैकी 9 तर मंठा निवडणुकीत 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने आपला भगवा फडकवला.
तिर्थपुरी इथल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळवला. तर निफाड नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला. इथे भाजपला शिवसेनेने धक्का देत 7 जागांवर विजयश्री प्राप्त केली.
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव नगरपंचायत निवडणुकीत तर काँग्रेसने भाजपला चारी मुंड्या चित करत 17 पैकी 17 जागांवर कब्जा केला. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने 40 हुन अधिक जागा आपल्या नावे केल्या.
नाशिक जिल्ह्यात मात्र भाजपने 3 पैकी 2 ठिकाणच्या निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व स्थापित केले आहे. तर शिवसेनेने एका ठिकाणी भगवा फडकवला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये दोन बहीण भावांच्या राजकीय लढाईत अर्थात, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये थेट झालेल्या लढतीत पंकजा मुंडे समर्थक वरचढ ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या पाचही नगरपंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे समर्थकांनी बाजी मारली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम