द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय असलेला अनिल देशमुख यांना CBI ने क्लीनचिट दिली असल्याच्या बातम्या पसरत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे चौकशींचा ससेमिरा सुरू आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI ) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख (anil deshmukh)यांना ‘क्लीनचिट’ देण्यात आली आहे. असा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. सीबीआयचा हा ६५ पानी अहवाल आहे. मात्र या अहवालावर स्पष्टपणे कोणीही प्रतिक्रिया दिली नाही.
उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केला. परंतु याच्या सत्तेत्तेवर प्रश्नचिन्ह आहे. आता सीबीआयकडून यासंदर्भात खुलाशा करण्यात आला आहे. सीबीआयने म्हटले आहे की, आमच्याकडे अनिल देशमुख (anil deshmukh)यांच्यासंदर्भात सातत्याने विचारणा होत आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेनंतर सीबीआयने तपास सुरु केला आहे. त्यानंतर तपासात मिळालेल्या पुराव्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला. २१ मे रोजी सीबीआयने एफआयआर (FIR) दाखल केला आहे. त्याची प्रत सीबीआयच्या वेबसाइटवर आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरु आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम