दादरमध्ये राज ठाकरेंविरोधात बॅनरबाजी ; मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलेला फोटो पुन्हा एकदा चर्चेत

0
17

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा दाखला देत, राज्य सरकारला एकप्रकारे 3 मे पर्यंतचा अल्टीमेटमच दिला आहे. या सभेनंतरही त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून टिकास्त्र सोडण्यात येत आहे. आता, राज यांच्या भूमिकांवरुन दादरच्या शिवसेना भवनासमोर राज ठाकरेविरुद्धचा एक बॅनर झळकला आहे.

या बॅनरवर तीन फोटोंची जागा आहे. मात्र, यातील एक जागा रिकामी असून तिथे प्रश्नचिन्ह देण्यात आलंय. राज ठाकरेंची पुढील भूमिका काय असेल? याबाबतचा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पहिल्या फोटोत राज यांच्या डोक्यावर मुस्लीम टोपी दिसून येत असून ‘काल’ असं येथे लिहिण्यात आलंय. दुसऱ्या फोटोत त्यांनी घेतलेल्या हनुमान चालीसाच्या भूमिकेचं चित्र दिसत आहे. त्यामध्ये, हनुमान आणि आज असं दिसून येत आहे. तर, तिसऱ्या फोटोत प्रश्नचिन्ह देण्यात आलं असून उद्या… असा शब्द लिहिण्यात आलाय.

मध्यभागी भगव्या रंगाच्या आयतामध्ये ‘हनुमान’ असं लिहिलं आहे. तर बाजूला चार प्रश्नचिन्हं छापण्यात आली असून त्यावर ‘उद्या’ असं लिहिण्यात आलंय. कालपर्यंत राज यांचा मुस्लिमांना पाठिंबा होता. आज ते हनुमानाचं नाव घेत आहेत तर उद्या काय करतील याबद्दल प्रश्नच आहे, अशा अर्थाने हा बॅनर लावण्यात आलाय. शिवसेना भवनासमोर बॅनरबाजीही करण्यात आली आहे. हे बॅनर कोणी लावले हे अद्याप स्पष्ट नाही, मात्र बॅनर आता काढण्यात आले आहेत. बॅनर कोणी लावले याचा तपास पोलीस करत आहेत.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here