द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; शिवसेनेचा दसरा मेळावा आज षण्मुखानंद सभागृहात पार पडला त्यात ठाकरे फारच आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे,
● मुख्यमंत्री आहे अस मला वाटता कामा नये, मी तुमचा भाऊ वाटलो पाहिजे.
● आमच्या भाषणानंतर अनेक जण चिरकायला तयार
● सत्ता येते जाते डोक्यात हवा जाऊ देऊ नका
● माझ्या कुटुंबावर टीका करताय ,करत रहा.
● अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ , ED, CBI च्या आडून येऊ नका.
● होय शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेलच
● फडणवीसांनी शब्द पाळला असता तर ते मुख्यमंत्री असते.
● मी वचन पाळण्यासाठी मुख्यमंत्री आहे.
● मी झोळी घेतलेला फकीर नाही . देश हाच आमचा धर्म
● शेतकऱ्यांना चिरडले भाजपचे हेच का हिंदुत्व
● हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच
● बाबरी दंगली वेळी शिवसेनेने मुंबई वाचवली
● तुमच्या पालख्यां वाहण्यासाठी आमचा जन्म नव्हे
● उपरे घेऊन भाजपा सर्वात मोठा पक्ष
● बलात्कारातील आरोपीला लवकरच फाशी
● महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम