संभाषणामधील ‘तो’ आवाज संजय राठोड यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रात गाजलेलं पूजा चव्हाण प्रकरणातील ‘गबरु’ कोण हे स्पष्ट झालं आहे.
पुणे प्रतिनिधी : राज्यात गाजलेले सर्वाधिक प्रकरण म्हणजे पूजा चव्हाण आत्महत्या, या प्रकरणाशी संबंधीत मोबाईलमधील संभाषणासंदर्भातील न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांना दोन महिन्यांपूर्वीच प्राप्त झाला आहे. मात्र हा दडवण्यात आल्याची माहिती मिळतेय. चव्हाण व अन्य व्यक्तीबरोबर झालेल्या संभाषणातील आवाज हा माजी मंत्री संजय राठोड यांचाच असल्याचे अहवालातून पुढे आले आहे, असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मात्र या अहवालानंतर राठोड यांच्या अडचणी वाढणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यात वानवडी येथील महंमदवाडीमध्ये पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली. यानंतर राज्यात प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपानंतर राज्यमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. मागील आठवड्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आणि राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, या प्रकरणाचा अद्याप तपास सुरूच असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. पोलिसांच्या भूमिकेवर देखील तेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते
त्यावेळी पूजा चव्हाण व दुसऱ्या व्यक्तीमध्ये मोबाईलवरुन झालेल्या संभाषणाच्या 12 ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. संबंधित ऑडीओ क्लिपसह मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झाले होते. पूजाच्या आत्महत्येच्या चार ते पाच दिवसांपुर्वी दोघांमध्ये 90 मिनिटांपर्यंत संभाषण झाले होते. संबंधीत संभाषण हे बंजारा भाषेत असल्याने त्यावरुन विविध प्रकारचे तर्क लढविले जात होते. मात्र, संबंधीत कॉल रेकॉर्ड पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ते न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पोलिसांना दोन महिन्यांपुर्वीच प्राप्त झाला आहे. मात्र, पोलिसांकडून त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत होती. सोमवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हा अहवाल प्राप्त झाल्याचे तसेच त्यामध्ये प्रथमदर्शनी पूजासोबत बोलणारी व्यक्ती ही संजय राठोडच असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शवविच्छेदन करताना पूजाचा व्हिसेराही राखून ठेवण्यता आला होता. त्यातील अहवालानुसार, तिने आत्महत्येपूर्वी दारू प्यायल्याचेही निष्पन्न झाले आहे. या अहवालात विविध बाबी समोर आल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम