ठाणे :
राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. राज्यात सत्ता परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं चित्र आहे. या राजकारणाच्या केंद्रस्थानी ठाण्याचे पालकमंत्री तथा महविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रीचेबल झाले होते. त्यानंतर मंगळवारी दिवसभर राजकीय गोंधळाची स्थिती होती. आता एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत आहे. अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम