द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला पुन्हा धारेवर धरले आहे. ठाकरे सरकार आल्यापासून केवळ भ्रष्टाचार करण्याचे काम केले असून. कोरोना काळात हे सरकार अयशस्वी ठरलं आहे. कोणत्याच प्रकारचे नियोजन नाही. त्यामुळे रोज नवीन नवीन निर्णय देऊन ते रद्द करण्याचे काम सध्या ठाकरे सरकारचे सुरू असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मावळ मधील पत्रकार परिषदेत केला. ते आज मावळ दौऱ्यावर होते.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन सुरू आहे. गौण खनिज उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली. मावळ मधील आंबळी गावालगत असलेल्या धरणापासून 100 फूट अंतरावर गौण खनिज उत्खनन होत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये अवैधरित्या उत्खनन हे मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची कंपनी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
सोमय्या यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व नंतर किरीट सोमय्या यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची भेट घेऊन मावळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्याकडे देखील याप्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. यामुळे भाजपा पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम