ठाकरे सरकारच्या घोटाळ्याचं तेरावं घालणार’- किरीट सोमय्या

0
15

मुंबई: आय एन एस विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची आज सलग तिसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. आता गुरुवारपर्यंत सोमय्या यांची चौकशी होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

आजच्या चौकशीनंतर माध्यमांसमोर बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) पुन्हा एकदा आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “आम्ही कसलाच घोटाळा केलेला नाही, त्यामुळे आम्हाला कसलीच भीती नाही, परंतू परवापासून एक एक अंक उघडकीस येणार आहे”. किरीट सोमय्याला जेलेमध्ये टाकणार, मेधा सोमय्याला जेलमध्ये टाकणार, नील सोमय्याला जेलमध्ये टाकणार असं बोलत उद्धव ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केले, तरी किरीट सोमय्या घाबरणार नाही, माझ्या नव्वद वर्षांच्या आईविरुद्धही एफआयआर केला तरी मी झुकणार नाही असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

ठाकरे सरकारने माझी तीन दिवस किंवा तेरा दिवस चौकशी करावी, पण ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचं तेरावं मीच घालणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

त्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना तेच उद्योग आहेत फक्त अडचणीत आले की विषय भरकटवायचे, असा जोरदार टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here