जळगावात राजकीय घडामोडींना उधाण ; भाजपाचा मैदानातून पळ

0
10

द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी : जळगावमध्ये सध्या राजकीय घडामोडींना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा बँक मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज माघारी घेत या निवडणुकीवर बहिष्कार घातला असल्याची माहिती भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिली आहे. पत्रकारांशी बोलतांना गिरीश महाजन यांनी हि घोषणा केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज आघाडी सरकारने अधिकाऱ्यांवर दबाव आणून बाद केल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी यावेळी केला. कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आमचा विश्वास घात केला आहे तसेच सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या तरी देखील त्यांनी आमच्या उमेदवारांवर कर्जाचे खोटे आरोप लावले आणि त्यांचा अर्ज स्वीकार होऊ दिला नाही. असे आरोप करत गिरीश महाजन यांनी कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर टीका केली आहे. मागील पाच वर्षांमध्ये अनेक चुकीचे काम येथे झाले आहे.

चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सदस्यांनी आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या संस्थांना कोटयावधी रुपये मंजूर केले आहे. यावर आम्ही कारवाई केली आहे मात्र हि बँक पदाधिकाऱ्यांसाठी आहे कि मग शेतकऱ्यांसाठी आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्ही सगळ्या तक्रारी केल्या आहेत यांचा आम्ही पाठपुरावा देखील करू आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी देखील आम्ही करू असे उद्गार त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here