जळगावात नितीन गडकरीसह पार पडणार महामार्गाचे लोकार्पण कार्यक्रम

0
14

केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवारी जळगाव व धुळे दौर्‍यावर असून या दौरात राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण पार पडणार आहे. धुळ्यातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात राष्ट्रीय करण्यात आला. जळगावात जी.एस. मैदानावर सायंकाळी 5.45 वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, शिक्षक आमदार सुधीर तांबे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच आमदार उपस्थित असतील.

शुक्रवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे धुळे येथून जळगावला येणार आहेत. त्यानंतर दुपारी 5 वाजता ते भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतील. जळगाव महामार्गांचे 199 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 2153 कोटी रुपये खर्च झालेला आहे. दरम्यान त्यानंतर 5.45 वाजता राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचे लोकार्पण करतील व नंतर 7 वाजता ते विमानाने नागपूरकडे जाणार आहेत.

 

 

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here