केतकी चितळेच्या पोस्टवर रुपाली ठोंबरेंनी दिले प्रत्युत्तर

0
23

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असलेली अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. तर राष्ट्रवादीकडून केतकीवर सडकून टीका केल्या जात आहेत.

केतकीने चितळेने फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट परत राष्ट्रवादीच्या शरद पवारांना खालच्या शब्दात सुनावले. लबाडाचा लबाड, तू तर मच्छर, तुला ब्राम्हणांचा मत्सर, अशा खालच्या शब्दांत केतकीने पवारांवर जोरदार टीका केली. यानंतर या पोस्टवर आक्रमक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यातच राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे संतापल्या आहे.

आक्रमक भूमिका घेत रूपाली ठोंबरे यांनीही एक पोस्ट करत केतकी चितळेच्या टीकेला खोचक शब्दात प्रतिउत्तर दिलं. ” चवताळलीस बाई तू, माहिला असलीस तरी छपरीच तूझावर संस्कार नसलेली केतकी इतकीशी कशी चवताळलीस. हरामखोर विकृती, मनोरूग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहिजेत, अशी सडकून टीका रूपाली ठोंबरे यांनी केली.

कशात ना मशात केतकीबाई तमाशात. लवकरच जंगी चोपाची गरज आहे बाई तुला चोप, असा कठोर शब्दांत इशारा रूपाली ठोंबरे यांनी दिला आहे. या पोस्टसोबत रूपाली ठोंबरे यांनी सडकी असा शब्द देखील वापरला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here