केतकी चितळेच्या न्यायालयीन पोलीसांना कोठडीतील मुक्कामात वाढ

0
30

मुंबई प्रतिनिधी:  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत फेसबुक पोस्ट लिहल्याप्रकरणी केतकी चितळे हिला पोलीस कोठडी सुनावली होती. आज सत्र न्यायालयाने पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर केतकी चितळेचा गोरेगाव पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.

केतकी चितळे हिला अद्याप दिलासा मिळाला नाही. केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीतील मुदत संपल्याने तिला आज 18 मे ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पुन्हा केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला. मुंबईतील भोईवाडा, पवई आणि गोरेगाव पोलीस ठाण्याततही केतकीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये 14 मे रोजी केतकी चितळे विरोधात कलम 153, कलम 500, कलम 501, कलम 505, कलम 504 आणि कलम 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात केतकी चितळे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आले आहेत.

केतकीविरोधात कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ्य नेत्यावर खालच्या भाषेत टीका करणे खपवून घेणार नाही, असाच इशाराच राष्ट्रवादीने दिला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here