द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपूर्वी राणे विरुद्ध सेना संघर्ष शिघेला पेटला होता. राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती, त्याचा परिणाम म्हणून राणेंना अटक झाली , या अटक नाट्यानंतर आज जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. यावेळी राणे यांनी रत्नागिरीत भाषण केले. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेचा उल्लेक टाळला. अटकेनंतरच्या पहिल्या भाषणात राणे यांनी शिवसेनेचे नावही घेतले नाही आणी टीकाही केली आहे. त्यामुळे राणे यांचे शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय पहिलेच राजकीय भाषण असेल, अशी चर्चा सुरु झाली राणेंचा हा बदल सर्व्यांना अवाक करणारा आहे.
आज राणे म्हणाले, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून मोबदला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे प्रत्येकाला न्याय मिळेल . माझ्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे. आंबा उत्पादकांवर मी आत्महत्या करण्याची वेळ येवू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले याच बरोबर नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या अनेक योजनांचीही माहिती राणे यांनी दिला. तसेच आठवडा भर फिरून आवाज गेलाय, अनेक औषधे खाल्ली पण आवाज जरा बसला आहे, असे सांगत त्यांनी आपले भाषण थांबवले. जास्त बोलन आवाजामुळे टाळले की अन्य काही कारण यावर मात्र चर्चा सुरु झाली.
आज पुन्हा शिवसेना आणि भाजपचा संघर्ष तीव्र होऊ नये यासाठी रत्नागिरी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. नियोजित वेळेनुसार रत्नागिरीत राणे यांचे विमान दाखल झाले. ही यात्रा सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटाही रत्नागिरीत तैनात करण्यात आला आहे.
नारायण राणे यांचे रत्नागिरीत विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप नेते आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, नितेश राणे, निलेश राणे, उपस्थित होते.
दिवसभर राणे रत्नागिरीत असणार आहेत. दुपारी ते पत्रकार परिषदेत घेणार आहेत.तेव्हा तरी सेनेवर बोलणार का हे बघावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना राणे यांना ‘व्हायरस’ ची उपमा देत टोला लगावला होता. यावर राणे काय बोलणार याकडे बघावे लागेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम