उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणाला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर, वाचा ‘ते’ पत्र जसंच्या तसं

0
27

मुंबई:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली. मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक भाषणाला आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आला आहे. आमदार संजय शिरसाट यांनी हे पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल त्यांचं शासकीय वर्षा निवासस्थान सोडलं. याच वर्षाची दारं ही अडीच वर्ष आमच्यासाठी बंद होती, असा थेट आरोप शिरसाट यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांना भेटायला आम्हाला वाट पाहावी लागत होती, तरीही मुख्यमंत्री भेटायचे नाही, अशी खदखदही या पत्रातून त्यांनी व्यक्त केली आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर हे पत्र शेअर केलं आहे (Letter to CM Uddhav Thackeray).


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here