उत्तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप

0
26

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राजकारणातील वेगळ्या प्रकारचे शीतयुद्ध सदैव सुरूच असते. आधी राष्ट्रवादी ने भाजपला जळगाव मध्ये धक्का दिल्यानंतर, आता भाजप ने देखील राष्ट्रवादी ला धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी आमदार अरुण पाटील, यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का मानला जात आहे. अरुण पाटील हे रावेर मतदार संघातून आधी दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस साठी, हा खरच खूप मोठा धक्का आहे.

भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली. आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. हा उत्तर महाराष्ट्र राजकारणातील मोठा राजकीय भूकंप होता. खडसे हे भाजपचे प्रबळ नेते होते.

आता राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अरुण पाटील यांनी, भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी ला, हा मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक यशस्वी खेळी केल्याचे, यामुळे बोलले जात आहे.
अरुण पाटील यांचा मोठा मतदार वर्ग आहे. आणि त्यांच्या भाजप प्रवेशामुळे, हा मतदार वर्ग आता निश्चितच भाजप कडे वळेल यात शंका नाही.

त्यात मोठ्या प्रमाणावर भाजप सोडून गेलेले, एकनाथ खडसे समर्थक देखील स्वगृही परतू लागल्याचे, बोलले जात आहे. त्यामुळे, भाजपला अजून प्रबळ बनण्यास यात मदत होणार आहे.

एकनाथ खडसे हे नाराज होऊन, भाजपला सोडचिठ्ठी देऊन गेले. आणि भाजपच्या किल्ल्याला एक प्रकारचे खिंडार पडले होते. मात्र आता अरुण पाटील यांच्या रूपाने पुन्हा एक प्रबळ नेता, भाजप मध्ये आल्याने भाजपची निश्चितच ताकद वाढली आहे. याचा फायदा, भाजप ला आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच होईल. यात तिळमात्र शंका नाही, अशी चर्चा झडू लागली आहे.

त्यामुळे आता येत्या काळात उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात, राजकीय वातावरण निश्चितच ढवळून निघेल यात शंका नाही. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला आपला किल्ला अजून प्रबळ करण्यास मदत होणार आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here