उत्तर प्रदेशासाठी काँग्रेसच्या बड्या घोषणा जाहीर

0
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे आणि त्यासाठी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आघाडी घेतली आहे. यूपी निवडणुकीपूर्वी काँग्रेसने महिलांसाठी वेगळा जाहीरनामा तयार केला आहे. प्रियंका गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

https://twitter.com/priyankagandhi/status/1455006510363283457

३ सिलेंडर मोफत दिले जातील
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, ‘उत्तर प्रदेशच्या माझ्या प्रिय बहिणींनो, तुमचा प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला आहे. ते समजून काँग्रेस पक्षाने आपल्यासाठी स्वतंत्र महिला जाहीरनामा तयार केला आहे. काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर वर्षाला भरलेले ३ सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. राज्य सरकारच्या बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास असेल.

https://twitter.com/priyankagandhi/status/1455007018050195465

महिलांसाठी काँग्रेसच्या घोषणा
प्रियंका गांधी यांनी पुढच्या ट्विटमध्ये सांगितले की, आशा आणि माझ्या अंगणवाडीच्या बहिणींना दरमहा १० हजार रुपये मानधन मिळेल. नवीन सरकारी पदांमध्ये आरक्षणाच्या तरतुदीनुसार ४० टक्के पदांवर महिलांची नियुक्ती केली जाणार आहे. वृद्ध-विधवा निवृत्ती वेतन दरमहा १००० रुपये दिले जाईल. उत्तर प्रदेशच्या भूमीतील नायिकांच्या नावाने राज्यभरात ७५ कौशल्य शाळा उघडल्या जाणार आहे असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here