ब्राम्हण समाजाबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. यावर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली, ‘मी कोणत्याही पक्षाबद्दल आणि जातीबद्दल बोललो नाही. ज्यांना वाटत असेल मी माफी मागावी त्यांनी अगोदर जिजाऊंची माफी मागावी मी माफी मागायला तयार आहे’ असं म्हणत अमोल मिटकरी यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला.
राज्यभरात भाजप आणि हिंदुत्त्वाची संघटनांनी अमोल मिटकरींच्या विधानाचा निषेध केला. मिटकरीच्या या विधानावर भाजपचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. ते जळगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. गिरीश महाजन म्हणाले, ”आमदार अमोल मिटकरी सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असे त्यांनी करू नये. अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार आहेत. त्यांनी बोलताना जातीय विष पेरले जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.”
अमोल मिटकरी यांची मंत्रोच्चारणा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लग्नाचा विधी, कन्यादान याविषयी अमोल मिटकरींनी केलेल्या विधानांमुळे ब्राह्मण, हिंदू समाजाची बदनामी झाल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आला. मिटकरी यांनी केलेल्या विधानानंतर ब्राह्मण महासंघाने पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम