मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधीचा वादग्रस्त वक्तव्य केले. मिटकरी यांनी केलेल्या विधानानंतर ब्राह्मण महासंघाने पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन केले. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही समोर येत त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे याही हजर होत्या. त्यांनी आंदोलकांना थेट इशाराच दिला आहे.
याबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, लोकशाही मार्गाने आंदोलन करा असं आवाहन आंदोलनकर्त्यांना केलं असताना ही यांनी कार्यालयात घुसून मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसेच, आमच्या नेत्यांबद्दल अपशब्दही बोलले तर महिला पदाधिकाऱ्यांनी आमच्या पुरुष पदाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही समोर येत त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला.
ठोंबरे यांनी सांगितले की, त्यांच्या कोणत्या भावना दुखावल्या गेल्या हे माहीत नाही आणि चांगल्या पद्धतीने वागूनही त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचे वक्तव्य करत आहेत. पोलिसांच्या आधारे आणि त्यांच्या आंदोलनाला रस्त्याच्या पलीकडे पाठवले. महासंघाच्या महिला अंगावर धावून आल्या. यांना आंदोलन करायचे आहे तर लोकशाही पद्धतीने करावा पुरुष वर्गाने पुढे न येता महिलावर्गाला आंदोलनात सहभागी करून घेतात आणि त्यांच्या महिला नंतर आरोप करतात.
मी त्यांचे आंदोलन झाल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही बुके 101 रुपये दक्षणा आणि केळीही आणली होती. परंतु, ते न घेता ते निघून गेले. आम्ही काही खोटं बोलत नाही हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे त्यामुळे खरं काय खोटं काय हे समोर येईलच. आमच्याकडून किंवा अमोल मिटकरींकडून कोणत्याही भावना दुखावल्या गेल्या नाहीत. त्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे. घुसण्याची भाषा करू नये, आमच्या घरात जर घुसलात तर, आम्ही कुठं-कुठं घुसू एवढं लक्षात ठेवावं त्यांनी, असा इशाराही रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम