द पॉंईंट नाऊ प्रतिनिधी : सातारा शहरातील पोवई नाका येथे आमदार शिवेंद्रराजे यांनी स्वखर्चातून सेल्फी पॉईंट उभारला आहे. आज या सेल्फी पॉईंटचे उदघाटन होणार होते मात्र आधीच आज खासदार उदयनराजे यांनी सेल्फी पॉईंटची पाहणी केली आणि तेथे छायाचित्र काढले. आज सायंकाळी सहा वाजता आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते त्याचे उदघाटन होणार आहे. मात्र उदयनराजे यांनी आपली पहिलेच तिथे उपस्थिती दाखवून राजकीयदृष्टीने धिंगाणा केला आहे.
मात्र आपले राजकारण हे सेल्फी पॉईंट पुरतेच मर्यादित आहे , काय हा प्रश्न येथे नक्कीच पडेल? सेल्फी पॉईंट साकारला म्हणजे आपली प्रगती झाली काय? किती दिवस आपण झुलवाझुलवीचे राजकारण करणार आहोत? एका सेल्फी पॉईंटमुळे नागरिकांचे मत तुम्हाला मिळणार असा विचार जर राजकारणी करत असतील तर त्यांनी राजकारणाचा काहीच अभ्यास केला नाही असे म्हणता येईल. लोक सेल्फी घेऊन आपली पोट भरणार आहेत काय ? नवीन रस्ते, उद्योगधंदे, शिक्षण, अन्न, पाणी. आरोग्य सेवा अजून बऱ्याच जीवनावश्यक बाबी आहेत त्यांची सोय कधी होणार?
समाजाचा विकास सेल्फी पॉईंटने होणार नाही म्हणून लवकर सावध व्हा आणि नागरिकांना ज्याची गरज आहे त्या सुविधा द्या असे राजकारण्यांना सांगावे लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम