आधी भाजपच्या सभेत दगडफेक आणि आता करुणा शर्मांवर हल्ला?

0
37

द पॉईंट नाऊ ब्युरो : नुकतंच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सभेवर दगडफेक झाल्याचा आरोप केला होता. आणि आता करुणा शर्मा यांनीही आपल्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

कोल्हापुरात प्रचारासाठी गेल्या असता, अज्ञात व्यक्ती आपल्या गाडीत येऊन बसली. कार्यकर्त्यांनी विचारणा केली असता, त्या व्यक्तीने आरडाओरड केली. कार्यकर्त्यांना गाडीत मारहाण केली. तसेच या व्यक्तीने आपला प्रत्येक सभेच्या ठिकाणी पाठलाग केल्याचा आरोप केला आहे.

करुणा शर्मा या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. याच करुणा शर्मांनी राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या प्रचाराला देखील लागल्या आहेत. आता त्यांनी या प्रचारादरम्यान आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. करुणा शर्मा या कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत राजकीय मैदानात उतरल्या आहेत.

याआधी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही कोल्हापूर येथे त्यांच्या राजकीय सभेदरम्यान स्टेजच्या दिशेने कोणीतरी दगड फेकल्याचा आरोप केला होता. समोर यायची हिम्मत नाही, म्हणून दगड भिरकावला का? असा सवाल त्यांनी केला होता.

चित्रा वाघ आणि करुणा शर्मा यांनी हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. कोल्हापूर मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here