आगामी महापौर भाजपचाच – गिरीश पालवे

0
82

नाशिक : महानगरपालिकेच्या येत्या निवडणूकीत भाजपाचेच बहुमत येणार असून भाजपने 100 प्लसचा नारा दिला. मागील पंचवार्षिक निवडणूकीत भाजपाकडे बहुमत तर होतेच त्यात 66 नगरसेवक निवडून आले होते. या पाच वर्षांच्या कालावधीत भाजपाने अनेक विकासकामे केली असून त्यांच्या बळावरच आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा दावा भाजपाचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे (Girish palve) यांंनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

पालवे म्हणाले की, नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहराचा होणार विकास डोळयासमेार ठेवून नाशिककरांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या मुलभूत गरजांबरोबरच विकासाचे अनेक प्रकल्प राबवून नाशिकचे नाव आता देशाच्या नकाशावर अग्रभागी आणले आहे.

विकासासाठी नाशिक महानगरपालिकेने स्वतःची प्रदुषणविरहित सीएनजी सिटीलिंक बससेवा सुरु केली. या बससेवेला केंद्राचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाला. नाशिक शहरात पाण्याच्या नवीन टाक्या, शहराच्या सर्व बाजूंचे रिंगरोड, एलईडीलाईट, प्रस्तावित न्युओ मेट्रो, नाशिक शहराच्या सर्व हद्दीपासून पुढे 20 किमीपर्यंत सिटी लिंक बस सेवा, के. के. वाघ कॉलेज ते आडगावच्या पुढे उड्डाणपुल निर्मिती, मंजुर झालेले व्दारका ते नाशिकरोड तीन मजली उड्डाणपुल, शहरामधील इतर दोन प्रस्तावित उड्डाणपुल, नाशिक शहरामधून जाणारा समृध्दी महामार्ग आणि सुरत ते चेन्नई महामार्ग, प्रस्तावित आयटी हबमुळे 300 एकर क्षेत्र विकसित होणार आहे. या सर्व कामांमुळे नाशिक मनपाच्या उत्पन्नात तब्बल 550 ते 600 कोटींची वाढ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमामधून आम्ही येणार्‍या नाशिक मनपा निवडणूकांना सामोरे जाणार आहोत, असे ते म्हणाले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here