महाराष्ट्रात भोंग्याच्या मुद्यावरुन वाद पेटला आहे. तर दुसरीकडे योगी सरकारने घेतलेल्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले आहे. राज ठाकरे यांनी नाव न घेता सरकारला टोला लगावलाय. यावरच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी टि्वटवर ठाकरे सरकारवर खोचक शब्दात टीका केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरेंनी योगिना अभिनंदन करत ट्विटवर सरकारला टोला लगावलाय, आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुध्दी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असे ठाकरे यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या ट्विटवरून अमृता फडणवीस यांनी देखील सरकारला डिवचले आहे.
“ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”, अशा शेलक्या शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. यातून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. भोंगे प्रकरण राजकारणाच्या वर्तुळात चांगलंच फिरताना दिसत आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरुन उत्तर प्रदेशातील अनेक धार्मिक स्थळांवरील भोंगे एकतर खाली करण्यात आले आहेत नाहीतर त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे. योगिन से कौतुक करताना अमृता फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम