हलाखीची परिस्थिती आणि आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने महिलांसाठी नवे आदेश जारी केला आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना पूर्ण बुरखा घालण्याचे आदेश देण्यात आला आहे.
कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून महिलांवर लादण्यात आलेल्या नियमांपैकी हा सर्वात कठोर नियम आहे. महिलांनी डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घालणे आवश्यक आहे. कारण ते पारंपारिक आणि आदरणीय आहे,” असे तालिबान प्रमुख हिबतुल्ला अखुंदजादा यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानात पारंपारिक पद्धतीने अनेक सक्तीचे आणि कठोर नियम महिलांवर लावण्यात येतात त्यातच आता आणखी एका नियमाची भर पडली आहे. काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानातील हेरातमधील अधिकाऱ्यांनी महिलांना वाहन परवाने देण्यास मनाई केली आहे. महिलांना आपल्या घरातील पुरुषांशिवाय देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत.
गेल्यावर्षी तालिबानने अफगाणिस्तानमधील मुलींच्या माध्यमिक शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. मुली आणि महिलांनी विरोध दर्शवला नंतर शाळा पुन्हा सुरु करण्यात यासाठी अनेक निदेर्श तयार केले. तालिबानने महिलांच्या स्वतंत्र विमान प्रवसावर देखील बंदी घातली आहे. त्या
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम